एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम पहावे लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केल्याचं म्हणत त्यांच कौतुक करण्यात येत आहे. परंतु या आधी देखील मुख्यमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांना शरद पवारांच्या मंत्रीमंडळात काम करावे लागले होते.